आपला जिल्हाताज्या घडामोडी

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीत भव्य बाईक रॅलीचे आयोजन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

मराठी नववर्ष, गुढीपाडव्याच्या उत्साहात सहभागी होण्यासाठी गडचिरोलीत भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आधारविश्व फाउंडेशन व लोकमत सखी मंच, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.

रॅली दि. १८ मार्च २०२६, बुधवारी दुपारी ३ वाजता सुरू होईल. रॅलीसाठी सहभागी होणाऱ्या सर्वांनी लवकरात लवकर नावे नोंदवण्याची विनंती करण्यात आली आहे. फेटे लावण्यासाठी सहभागी महिलांनी दुपारी २ वाजता परिणीता लोन, आरमोरी रोड, गडचिरोली येथे उपस्थित राहावे.

रॅली मार्ग :-

प्रारंभ : परिणीता लोन, आरमोरी रोड

इंदिरा गांधी चौक,चंद्रपूर रोड, आयटीआय चौक

रिटर्न : इंदिरा गांधी चौकातून धानोरा रोड, शिवाजी महाविद्यालय

रेड्डी गोडाऊन, पोटेगांव बायपास, चामोर्शी रोड

समारोप : साईमंदिर, अल्पोपहारासह

ड्रेसकोड: पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा – लुगडं, साडी, नथ

अधिक माहितीसाठी संपर्क :-

प्रा. सुनिता साळवे (सचिव, आधारविश्व फाउंडेशन) – 9423122934

प्रा. विणा महाजन (उपाध्यक्ष, आधारविश्व फाउंडेशन) – 9422709000

प्रा. विजया मने (आधारविश्व फाउंडेशन) – 9421734434

रश्मी आखाडे (जिल्हा संयोजिका, लोकमत सखी मंच) – 7038647733

भाग्यश्री गड्डमवार (जिल्हा संयोजिका, लोकमत कॅम्पस क्लब) – 9405155628

उत्साही महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker