आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजीक

गडचिरोलीत आज रंगणार ‘भव्य तान्हा पोळा उत्सव’

जय हिंद दुर्गा उत्सव मंडळाचा उपक्रम; नंदीबैल सजावट, वेशभूषा अन् सामाजिक संदेशासाठी आकर्षक बक्षिसे

गडचिरोली, प्रतिनिधी :

महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी संस्कृतीची परंपरा जपणारा तान्हा पोळा उत्सव जय हिंद दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोलीच्या वतीने यंदाही शेकडो वर्षांपासुन सुरु असलेल्या शहरातील आकर्षण मुख्य तान्हा पोळा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान महात्मा गांधी चौक, गडचिरोली येथे ‘भव्य तान्हा पोळा उत्सव’ होणार आहे.

बालगोपालांमध्ये आपल्या पारंपरिक संस्कृतीविषयी अभिमान निर्माण व्हावा, शेतकरी व बैलांचे महत्त्व समजावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने यंदा नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेची नियमावली:-

१) नंदीबैल सजावट :

नंदीबैलाची आकर्षक, पारंपरिक व कलात्मक सजावट करणे आवश्यक राहील.

२) वेशभूषा :

नंदीबैलासोबत सहभागी होणाऱ्या व्यक्तीची वेशभूषा पारंपरिक, आकर्षक व विषयाला अनुरूप असावी.

३) सामाजिक / राष्ट्रीय संदेश :

नंदीबैलाच्या सजावटीतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, ‘बेटी बचाओ’, देशभक्ती, एकता तसेच इतर सामाजिक किंवा राष्ट्रीय विषयांचा प्रभावी संदेश देता येईल.

विजेत्यांचा गौरव :

नंदीबैल सजावट, वेशभूषा आणि सामाजिक संदेश या बाबींच्या आधारे उत्कृष्ट ठरणाऱ्या सहभागींची निवड करून त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

पाच क्रमांकांना रोख पारितोषिके

स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ₹५,००१, द्वितीय ₹३,००१, तृतीय ₹२,००१, तर चतुर्थ व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ₹१,५०१ रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय ₹३०० ची दहा प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रथम पारितोषिक स्व. प्रभाकरराव वाळेकर व श्री. रविभाऊ वासेकर, द्वितीय पारितोषिक श्री. नितीन भाऊ हर्षे, तृतीय पारितोषिक स्व. प्रभाकरराव खडसे व श्री. प्रविणभाऊ खडसे, चतुर्थ पारितोषिक स्व. वसंतराव धकाते व श्री. दिलीप धकाते, तर पाचवे पारितोषिक स्व. विठ्ठलराव साळवे व श्री. हेमंत साळवे यांच्या सहकार्याने ठेवण्यात आले आहे.

तसेच स्व. सुधाकरराव सावकार चन्नावार (अलंकार टेक्स्टाईल्स) यांच्या स्मृती प्रोत्साहनपर 10 बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्व. बळीरामजी धकाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ

यंदाच्या स्पर्धेतील स्मृतिचिन्ह स्व. बळीरामजी धकाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार आहे.

“नंदी माझा अभिमान… आपली परंपरा, आपला अभिमान!” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय हिंद दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने रवींद्र वासेकर,नितीन हर्षे, प्रविणभाऊ खडसे, दिलीप धकाते, बालू चन्नावार हेमंत साळवे केले आहे.स्पर्धेचे परीक्षण समन्वयक म्हणून उदय धकाते, गडचिरोली यांची भूमिका राहणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker