आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
विद्यार्थ्याच्या अपघातात मुख्याध्यापकांचे रक्तदान; जीव वाचवण्यासाठी तत्पर मदत

गुरवळा (गडचिरोली), प्रतिनिधी :-
येथील नवयुग विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी लोमेश मडावी याचा अलीकडे मोटारसायकल अपघात झाला. या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले. तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने डॉक्टरांनी रक्ताची गरज व्यक्त केली.
या गंभीर परिस्थितीत नवयुग विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज कवठे यांनी तत्काळ पुढाकार घेत ओ-प्लस गटाचे रक्तदान केले. त्यांच्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्याच्या उपचारांना त्वरित सुरुवात होऊन त्याचा जीव वाचवण्यात मोठी मदत झाली.
मुख्याध्यापक कवठे यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कृतीतून समाजात रक्तदानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. संकटाच्या वेळी पुढे येऊन मदत करणारी माणसे समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतात.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



