आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
गडचिरोलीत दोन अत्याधुनिक ‘ICU रुग्णवाहिका’
दुर्गम भागातील रुग्णांना मिळणार जीवदान!

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आज एक मोठे पाऊल पडले आहे. सेमाना येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा प्रकल्पांतर्गत आणि ‘Research Organization for Living Enhancement’ (ROLE) संस्थेच्या वतीने दोन अत्याधुनिक ICU रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकांमुळे गंभीर रुग्णांना प्रवासादरम्यानच ‘लाईफ सपोर्ट’ मिळणार असून, अनेकांचे प्राण वाचवणे आता अधिक सुलभ होणार आहे.

’फिरते रुग्णालय’ म्हणून करणार काम
गडचिरोली जिल्ह्याची दुर्गम भौगोलिक स्थिती पाहता, गंभीर रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरात नेण्यासाठी मोठा वेळ लागतो. अशा परिस्थितीत या नव्या रुग्णवाहिका केवळ वाहन नसून एक ‘फिरते रुग्णालय’ म्हणून ओळखल्या जातील. या रुग्णवाहिकांमध्ये खालील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
व्हेंटिलेटर (Ventilator)
कार्डियाक मॉनिटर (Cardiac Monitor)
लाईफ सपोर्टच्या सर्व प्रगत सुविधा



