आपला जिल्हाताज्या घडामोडी
मोठी बातमी: गडचिरोलीत उष्णतेची तीव्र लाट; कामगारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची ‘कडक’ नियमावली लागू!

गडचिरोली (महाभारत न्यूज प्रतिनिधी):-
राज्यात वाढत्या तापमानाचा पारा चढत असतानाच, गडचिरोली जिल्ह्यातही उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत असल्याने, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी तातडीची नियमावली जाहीर केली आहे.
कामाच्या वेळेत मोठे बदल; दुपारचे काम टाळा !
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम आणि शेती क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
वेळेचे नियोजन: दुपारच्या कडक उन्हात कष्टाची कामे करणे टाळून, ही कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी थंड वातावरणात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कामाच्या ठिकाणी सोयी: प्रत्येक कामाच्या ठिकाणी सावलीची व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स आणि ‘आईस पॅक’ असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.



