आपला जिल्हाताज्या घडामोडी

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

पेट्रोल व डिझेलच्या सतत वाढत असलेल्या दरांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

“बहुत हो गई महंगाई की मार, हद्दपार करो मोदी सरकार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत वाढती महागाई ही सर्वसामान्य जनतेसाठी मोठे संकट ठरत असल्याचे सांगितले.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढल्या आहेत. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक कठीण झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनाही डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसत असून शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्याने नागरिक व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने तात्काळ पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक नंदू कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सचिव नंदू वाईलकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसच्या सचिव कुसुम अलाम, माधुरीताई मडावी, माजी नगरसेवक विजय गोरडवार, माजी नगरसेवक संजय मेश्राम, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई पंजेवाणी, माजी नगरसेवक रवींद्र किरमिरवार, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विवेक घोंगडे, अभिजीत घाईत, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, जितू मुनघाटे, श्रीनिवास आंबटवार, अविनाश साळवे, मिलिंद बागेसार, शालिनी पेंदाम, रीता गोवर्धन, कविता उराडे, माजी नगरसेविका मीनलताई चिमूरकर, शितलताई ठवरे, उमाजी बारसागडे, तुळशीदास भोयर, सरपंच संजय गावडे, जितेंद्र मुप्पीडवार, युवराज जुवारे, योगेश नैताम, नंदू सोमणकर, चारुदत्त पोहाणे, अतुल राचमलवार, सोनू अलाम, सचिन सोमनकर, नंदू सोमनकर, अभिषेक चौधरी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker