आपला जिल्हाताज्या घडामोडी

शेतकऱ्यांचा संघर्ष हा आमचा संघर्ष- ॲड. विश्वजीत कोवासे

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात केवळ उपस्थिती नोंदविण्यापुरते मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसोबत रात्र जागवून त्यांच्या समस्या आणि भावना जाणून घेतल्या.

यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या तसेच प्रशासन आणि शासन स्तरावर त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ भाषणे न देता प्रत्यक्ष त्यांच्या संघर्षात सहभागी होणे हीच काँग्रेस पक्षाची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.

च्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाहीही ॲड. कोवासे यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांचा संघर्ष हा आमचा संघर्ष आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकऱ्यांच्या जमिनी, हक्क आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच त्यांच्या सोबत राहील.”

शेतकरी आंदोलनाला विविध सामाजिक, राजकीय आणि शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker