गडचिरोली, प्रतिनिधी :-
आम्रपाली बुद्ध विहार, फुले वार्ड, गडचिरोली येथे वर्षावास प्रवचन मालिकेअंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित महान ग्रंथ व पुस्तके’ या विषयावर सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रवचन संपन्न झाले.
बौद्ध मंडळाचे अध्यक्ष आद. यशवंतजी वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष आद. लहू रामटेके यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बालपणापासूनच असलेली वाचन व अभ्यासाची आवड, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेला अथक अभ्यास, त्यासाठी घेतलेले परिश्रम तसेच त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथ व पुस्तकांविषयी रामटेके यांनी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी वयोवृद्ध उपासिका आयुनि ताराबाई मुरमाडकर, आयुनि विभाताई खेवले, आयुनि गुणाबाई भोयर, आयुनि मनिषा गेडाम, आयुनि संघमित्रा डोंगरे, आयुनि रोजा घाधरगुंडे, आयुनि स्वाती वंजारे यांच्यासह बहुसंख्य उपासिका व बाल उपासिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्तय घेण्यात आले. आयुनि स्वाती वंजारे यांनी फलदान केले. उत्स्फूर्त उपस्थितीत वर्षावास मालिकेतील या प्रवचनाचा समारोप करण्यात आला.
Back to top button