निवडणूकराजकीय

काँग्रेसला मोठा धक्का : जिल्हाध्यक्षा कविता मोहोरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

गडचिरोली, प्रतिनिधी :-

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता मोहोरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे आगामी ४८ तासांत होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

मोहोरकर या गेल्या अनेक वर्षांत वकिली क्षेत्रात भक्कम ओळख निर्माण केलेल्या व्यक्ती. काँग्रेसने त्यांना महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा म्हणून जबाबदारी दिली होती. विविध आंदोलनांत सहभागासह त्यांची आक्रमक भूमिका सातत्याने दिसून आली. गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष होते.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता मोहोरकर यांनी आज आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.

➡️ नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची काँग्रेसवरील नाराजी वाढली होती.

➡️ या प्रवेशामुळे ३६ तासांवर आलेल्या निवडणुकीत काँग्रेसची समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता.

➡️ याआधीही आमदार आत्राम यांनी काँग्रेस-भाजपातील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत राजकीय वळण दिले आहे.

मात्र काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी  त्यांची उमेदवारी जाहीर न केल्याने मोहोरकर यांचा पक्षातील नाराजीचा सूर वाढल्याचे चर्चेत होते. अखेर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गडचिरोलीच्या राजकारणात पुढील काही तासांत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे…

या प्रवेशामुळे काँग्रेसच्या समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही आमदार आत्राम यांनी काँग्रेसचे मोटवानी, भाजपाचे रवींद्र ओलल्लवार आणि गीता हिंगे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार धक्का दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सलग खेळीमुळे गडचिरोलीतील राजकीय वातावरणात पुढील ३६ तासांत आणखी कोणते बदल घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker