क्राईम
जिमलगट्टा पोलीसांनी पावणे दोन लाखाची जप्त केली.

गडचिरोली,प्रतिनिधी :-
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याची कारवाई जोरात सुरु असून जिमलगट्टा पोलीसांनी पावणे दोन लाखाची जप्त केली आहे.
जिमलगट्टा येथील आदेश सत्यप्रकाश यादव तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडा (किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी याचे घरी अवैधरित्या विना परवाना मोठ्या प्रमाणात रॉकेट देशी दारु चे साठा करुन वेगवेगळे दारु विक्रेते याना व चिल्लर विक्री करीता पाठवित आहे. अशी माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर, उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिरादार व पोलीस स्टाफ यांनी पंचांसह मौजा तुमलबोडा (किष्टापूर टोला) येथे राहत असलेल्या बक्का बोडका तलांडी यांचे घरी धाड घातली.
त्या वेळी घरात मोठ्या प्रमाणात कागदी काटुन बॉक्स आढळुन आले. त्यानंतर कागदी काटुन बॉक्स मध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा 90 एम.एल. क्षमता असलेले मद्याने भरलेले सिल बंद प्लास्टिक बॉटल आढळुन आले. एका कागदी काटुन बॉक्समध्ये 100 नग सिल बंद प्लास्टिक बॉटल याप्रमाणे 50 कागदी काटुनमध्ये 5000 नग सिल बंद प्लास्टीक बॉटल असुन प्रती नग 35/- रु. प्रमाणे 1,75,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाबाबत तलांडी यांच्याकडे चौकशी केली असता, सदरील अवैध दारुचा साठा 1) आदेश सत्यप्रकाश यादव, 2) रामनरेश साहेबसिंग यादव व 3) मनोज मुजुमदार यांनी विक्री करीता माझ्याकडे साठवुन ठेवले असल्याचे सांगीतले.
यावरुन आरोपींचा गावात शोध घेतला असता, आरोपी नामे रामनरेश यादव हा पोलिसांना सापडला असून आरोपी आदेश यादव हा पळुन जाण्यात यशस्वी झाला. सदर गुन्ह्राचा पुढील तपास परि.पोउपनि. ज्ञानेश्वर कोल्हे हे करत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार पोउपनि. आनंद गिरे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.



