सामाजीकसाहित्यिक

माणिक कुटी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

– राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा आषाढी एकादशीला उपक्रम

देवाडा,प्रतिनिधी :-

आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने महाकाली नगरी, देवाडा (चंद्रपूर) येथील माणिक कुटी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. माजी सैनिक तथा समाजसेवी मनोज ठेंगणे, आयटीआयचे सेवानिवृत्त गटनिदेशक नामदेव गेडकर, झाडीपट्टीचे लेखक डॉ. प्रा. धनराज खानोरकर, प्रा. नामदेव मोरे, डॉ. धर्मा गावंडे, सौ. रजनी बोढेकर, बंडू टेकाम गुरुजी, नाटककार व अभिनेता महेंद्र भिमटे, बालकार्यकर्ते चि. गौरव पिपरे आणि रेयांश घोडेस्वार यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सौ. रजनी बोढेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. खानोरकर होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. खानोरकर म्हणाले, “वृक्ष हेच खरे आपले प्राणवायू स्त्रोत आहेत. त्यांच्या संगोपनातच भविष्यातील सुरक्षितता आहे. प्रत्येक झाडाचा वाढदिवस साजरा केला तर झाडांप्रती जिव्हाळा निर्माण होईल.” त्यांनी राष्ट्रसंतांच्या व तुकाराम महाराजांच्या ओव्यांच्या माध्यमातून वृक्षांचे महत्त्व उलगडले, तसेच स्वतः रचलेली पावसाळी कविताही सादर केली.

या प्रसंगी सर्व मान्यवरांनी पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker