गडचिरोली, प्रतिनिधी : –
वडलापेठा येथे प्रस्तावित स्पाॅंज आयर्न प्रकल्प हा जगातील सर्वात उच्च प्रतीचा प्रदुषण निर्माण करणारा प्रकल्प असून तो पाचव्या अनुसूची क्षेत्रातील अनेक तरतूदी धाब्यावर बसवून बेकायदा पध्दतीने करण्याचा प्रयत्न असून पर्यावरणीय मुद्यांवर आक्षेप नोंदवू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले.
सदर जनसूनावणी ही सर्वांसाठी खुली असतांना केवळ प्रकल्पाची पोलखोल होवू नये यासाठी आम्हाला विविध कारणे सांगून पोलीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले. यापूर्वीही तगडा पोलीस बंदोबस्त लावून जनसूनावणीत सहभागी होण्यासाठी आम्हाला रोखण्यात आलेले होते. त्यामुळे या अशा बोगस जनसूनावण्यांच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर लवकरच सविस्तर तक्रार दाखल करुन न्याय मागण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांनी दिली असून हुकूमशाही पध्दतीने घेतलेल्या जनसूनावणीचा निषेध केला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia