सामाजीक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील आदिवासी परधान समाज मंदिर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळेस सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, अमोल मेश्राम, सचिव नरेंद्र शेडमाके,विवेक वाकडे, महेंद्र मसराम, अजय सुरपाम, विजय उके यांच्या हस्ते पुष्प व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

समाजातील वंचित घटकांच्या उद्धारासाठी त्यांनी दिलेली सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, आणि समतेची शिकवण प्रेरणादायी आहे. असा आदर उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळेस उपस्थित विजय सुरपाम, वैभव रामटेके,राज डोंगरे, आकाश कुळमेथे,निखील वाकडे,अनिकेत बांबोळे, ताजिसा कोडापे,साहिल शेडमाके, अंकुश बारसागडे,रोहित अत्राम, अजय मसराम, महादेव कांबळे, अवी शेंडे, गणेश मेश्राम,अजय सिडाम, नितीन शेडमाके,प्रियांशू कामडी, साहिल लोहि, अशोक नरोटे,दिनेश मेश्राम, राजेश डोंगरे,यश कुळमेथे,हिमांशु वाकडे, तुषार गोवर्धन,सुरज गेडाम, टिपेश डोंगरे यांच्यासह इतर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुपेश सलामे यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार मानले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker