आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अत्याधुनिक MRI यंत्र खरेदीस मंजुरी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र शासन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली येथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या अंतर्गत ३.० टेस्ला मॅग्नेटिक रेजोनन्स इमेजिंग (MRI) यंत्र खरेदीसाठी तब्बल २९ कोटी ९९ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून ही खरेदी करण्यात येणार आहे. नव्या MRI यंत्रामुळे रुग्णांना अचूक व जलद निदानाची सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

शासनाने यंत्र खरेदी प्रक्रियेसाठी काही अटी देखील घालून दिल्या आहेत. खरेदी प्रक्रिया शासनाच्या नियमावलीनुसार पारदर्शक पद्धतीने राबविणे, किमान तीन उत्पादकांकडून निविदा मागविणे, तांत्रिक तपशील कोणत्याही विशिष्ट कंपनीला लाभदायक ठरणार नाही याची खात्री करणे तसेच बाजारभावापेक्षा अधिक दर देण्यात येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक राहणार आहे.

या प्रकल्पांतर्गत MRI यंत्रासोबत आवश्यक सुटे भाग व पायाभूत सुविधा उभारणी देखील करण्यात येणार आहे. नव्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणामुळे गडचिरोलीसह परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागण्याची गरज कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker