अहेरी, प्रतिनिधी :-
अहेरी मध्ये आज १७ उमेदवार, धर्मराव आत्राम, नीता तलांडी यांचे सह १७ नामनिदर्शन पत्र दाखल झाले आहे. आत्राम राज परिवाराकडून सर्वाधिक अर्ज आले असून काँग्रेसचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांच्या कन्या नीता पेंटा तलांडी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. येथे भाजप-काँग्रेस मध्ये बंडखोरी झालेली आहे.
69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात आज एकूण 17 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यात नितीन कविश्वर पदा (अपक्ष), भाग्यश्री मनोहर लेखामी (अपक्ष), आत्राम धरमराव भगवंतराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी) यांचे तीन अर्ज, निता पेंटाजी तलांडी (अपक्ष), आत्राम तनुश्री धर्मरावबाबा(नॅशनालिस्ट काँगेस पार्टी) यांचे तीन अर्ज, संदीप मारोती कोरेत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रमेश वेल्ला गावडे (बहुजन समाज पक्ष), अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), हनमंतु गंगाराम मडावी (अपक्ष), पोरतेट ऋषी बोंदय्या(नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गट), कुमरम महेश जयराम (अपक्ष), गेडाम शैलेश बिच्चू(अपक्ष) यांचा समावेश आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button