सामाजीक
शिवाजी महाराजांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी- प्रमोद पिपरे

गडचिरोली,प्रतिनिधी :-
शिवाजी महाराज हे एक पराक्रमी योद्धा होते ते सुस्वभावी, लढवय्ये व कर्तव्यदक्ष राजे होते. त्यांनी स्वकर्तृत्व व पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. त्यांच्या पराक्रमाचा व विचारांचा आदर्श घेऊन युवकांनी कार्य करावे व आपल्या जीवनात प्रगती करावी. शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी केले. विसापूर येथे आयोजित शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिवराय युवा मंडळ विसापूर च्या वतीने विसापूर येथील शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे रामकिरीत यादव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, राजुभाऊ कावळे , नंदूजी कुमरे लालाजी पाल विशाल उरकुडे विकास देशमुख सुरज बावनवाडे शुभम कोटगले कुमोद कोटगले रुपेश मंडकवार रुकेश कोटगले चेतक भोयर गौरव चांदेकर कुसमाकर भोयर व मान्यवर उपस्थित होते.



