गडचिरोली,प्रतिनिधी :-
आज सकाळ च्या सुमारास गडचिरोली शहरात आलेला वाघास अखेर वन विभागाला पकडण्यास यश आले असून शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
शहरातील मध्यवर्ती असलेले आयटी आय ला लागून असलेले कृषी संशोधन केंद्र सोनापूर येथील आवरास बिबट नागरिकांना दिसून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या बाबत वनविभागाला कळविण्यात आले. वाघास जेरबंद करण्यास चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. या टीममधील शुटर ने वाघास बेहोष केल्यानंतर त्या वाघास ताब्यात घेण्यास यश मिळविले.
वाघ बघण्याकरिता महामार्गावर नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी हा मार्ग काही काळ बंद केला होता. आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. वनविभागातील कर्मचारी सुद्धा बंदोबस्त मध्ये होते.