सामाजीक

कारगील चौकात उत्साहात डॉ.आंबेडकर जयंती

गडचिरोली,प्रतिनिधी :-

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०२३ ला उत्साहात साजरी करण्यात आली.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे उपाध्यक्ष कालू गोवर्धन आणि जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक श्री पाटील यांनी केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते,मार्गदर्शक डॉ.नरेश बिडकर,नरेश चन्नावार,नंदू कुमारे,सामाजिक कार्यकर्ते दीपक मडके,माजी नगरसेवक मेश्राम,पुरुषोत्तम शेंडे,संदीप कांबळे,महादेव कांबळे,सचिन काळे,मोहित ठाकूर,सोनू पठाण,देवा कन्नाके आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता मंडळाचे कार्यकर्ते महेंद्र मसराम,रुपेश सलामे,राज डोंगरे,राजेश डोंगरे,विवेक वाकडे,विजय सुरपाम,वैभव रामटेके,साहिल गोवर्धन,अजय शिडाम,अजय सुरपाम,निखील वाकडे यांनी सहकार्य केले.

संध्याकाळी सर्व नागरिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी  कारगील स्मारक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker