आरोग्य व शिक्षण

सिंधु हॉस्पिटलमध्ये जिवनदायी, जनआरोग्य योजनेचा मिळणार लाभ

गडचिरोली,प्रतिनिधी :-

स्थानिक विसापूर मार्गावरील कारगिल चौकातील सिंधु ऑर्थोपेडीक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार संचालित महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाली आहे.

यामध्ये फ्रॅक्चर, हाडांचे व सांध्याचे संक्रमण, दुर्बिणद्वारे सांध्यांच्या शस्त्रक्रिया मणक्यांचे ऑपरेशन, वाकलेले हात-पाय सरळ करण्याच्या शस्त्रक्रिया यांचा समावेश राहील. या योजनेचा लाभ राज्यातील व राज्याबाहेरील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन या हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोगतज्ञ डॉ. नरेश बिडकर यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पहिला रूग्ण ३० सप्टेंबर रोजी भरती करून २४ तासाचे आत त्याची निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली.या योजनेअंतर्गत अस्थिरोगाशी बहुतांश शस्त्रक्रिया संपुर्ण मोफत करण्यात येणार आहेत.

https://youtu.be/ukINlQiCSe8

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker