अपघात

अपघाताला आळा घालण्यास शहरात स्पीड बेकर तयार करा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

कारगिल चौकात भाजीपाला विक्रेते,खाजगी बस,ट्रक,ईतर वाहने ठेवण्यास मनाई करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी नगर परिषद पोलीस विभागाला निवेदन दिले आहे. या बाबत प्रशासन या निवेदनाची गंभीरतेने दखल घेतली असून या वर लवकरच कारवाही करू असे आश्वासन शिष्टमंडळ ला दिले आहे.

कारगिल चौक,गडचिरोली येथे दिनांक १ मे २०२३ ला या चौकात एकवीस वर्षीय विद्यार्थी विकास बोगा,रा.गोडलवाही ता. धानोरा याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

मागील काही वर्षापासून खाजगी वाहन यामध्ये बस,ट्रक,व ईतर वाहने ,मुख्य जिल्हा मार्गावर रात्रीचे वेळी मुक्कामी राहतात. यामुळे सर्व नागरिकांना प्रचंड नाहक त्रास होत आहे.      

गडचिरोलीतील मुख्य चौकापैकी एक म्हणून कारगिल चौक आहे. या चौकात रस्त्याला वळण असल्याने येथे दिवसा आणि रात्रीचे  वेळेस खाजगी बस व ट्रकसह ईतर वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे राहत असल्यांमुळे या भागात वाहतुकीची नेहमीच कोंडी निर्माण होऊन वाहतुकीस अडथळे निर्माण होत असते. इथे भाजीपाले विक्रेते सुद्धा मुख्य रस्त्यावर दुकाने लावतात. यांचे योग्य ठिकाणी स्थानांतरण करावे. रुग्णांना नेहमी रुग्णवाहिकेतून नेतांना या मार्गातून, मार्ग काढण्यास तारेवरची कसरत करावी लागते. याच परिसरात किरकोळ व  गंभीर स्वरूपाचे अपघात रोज होत आहेत.

या राष्ट्रीय महामार्गावरील नालीवर अनेक दुकानदारांनी दुकाने थाटले आहे. या मुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावे लागत आहे.सदर परिसर वरील दुकाने हटविण्यात यावे.सुरळीत रहदारी सुरु करावी. या मार्गावर सिग्नल सुरु करावे.तसेच स्पीड बेकर लावण्यात यावे.                    

या बाबत २०१४ मध्ये कारगील चौकातील नागरिकांनी येथे सतत होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली व शहर पोलीस वाहतूक शाखा यांच्या कडे तक्रारी केल्यानंतर  कारवाई केली होती.  या भागात रस्त्यावर वाहने नव्हते. परंतु परत इथे वाहने ठेवण्यात येत आहे. या वाहन धारकांना इथे वाहने ठेवण्यास नागरिक नेहमी मनाई करत असताना सुद्धा इथे मुजोरी वाद निर्माण करून वाहने ठेवत आहेत.

या परिसरातील व शहरातील  पुरुष-महिला आणि बच्चे कंपनी हे नेहमी सकाळी आणि रात्री व्यायाम साठी फिरायला जात असतात. वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनामुळे यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते.

दिनांक १ मे २०२३ ला या चौकात एकवीस वर्षीय विद्यार्थी विकास बोगा,रा.गोडलवाही ता. धानोरा याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

दिनांक १ जून २०२३ पासून शालेय शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या मार्गावरून रोज हजारो विद्यार्थी हे शाळेत पायदळ आणि सायकलने शाळेत ये-जात असतात. या वाहनामुळे येथे गंभीर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

या पूर्वी सुद्धा या ठिकाणी पोलीस मुख्यालय चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा यांचे  वाहनाचा  अपघात दिनांक २७ मार्च २०२१ ला झाला होता. सुदैवाने इथे जीवित हानी टळली. असे नेहमीच अपघात होत आहेत.

निवेदन देताना कारगील चौकातील उदय धकाते, नरेंद चन्नावार, नंदू कुमरे, सुनील देशमुख,राजू पुंडलिकर,सुरेश लोणारे आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.