मुंबई, प्रतिनिधी :-
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी तपास यंत्रणेला महत्त्वाचे यश मिळाले आहे. एयरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) ने अपघातग्रस्त विमानाच्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या हस्तगत केली आहे.
या डेटामधून विमानाचा वेग, उंची, इंजिनची कार्यस्थिती यांसारखी महत्त्वाची तांत्रिक माहिती उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वैमानिकांचे अखेरचे संभाषण रेकॉर्ड करणारा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आगीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे संबंधित माहिती मिळवण्यासाठी उत्पादक कंपनीमार्फत अमेरिका येथील तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा संपूर्ण तपास आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) च्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुरू असून, लवकरच अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तपास यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
Back to top button