क्राईम

नक्षलवादीचे दोन हजार च्या नोटा, २७ लाख ६२ हजार रु. केले जप्त

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात  चलनातून बाद झालेल्या दोन हजार ची नोट बदली साठी नेण्यार्या दोन संशयित व्यक्तींना आज अटक करण्यात आली असून सदर रक्कम हि नक्षलवादी यांची असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रु. च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या २ हजार रु. च्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे ते लोकांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलवुन घेत आहेत. ब-याच ठिकाणी माओवाद्यांच्या या रक्कमा जप्त केल्या गेल्या आहे. आज दुपारी ०२.०० वा. पोलिसांना  मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकांच्या जवानांची नाकाबंदी अहेरी येथे लावली असता त्याठिकाणी २ संशयीत इसमाकडुन २७ लाख ६२ हजार रुपयाचे बेकायदेशीर रक्कम मिळुन सापडली. 

सविस्तर माहिती अशी की, संशयीत इसम १) नामे रोहीत मंगु कोरसा, वय २४ वर्ष, रा. धोडुर ता. एटापल्ली जि. गडचिरोली, २) नामे बिप्लव गितीश सिकदार, वय २४ वर्ष, रा. पानावर जि. कांकेर (छ. ग.) हे दोघे मोटार सायकलने जात असतांना नाकाबंदी दरम्यान विचारपुस केली असता त्यांच्याजवळ २ हजार रु. ६०७ नोटा एकुण रक्कम १२,१४,००० /- रु. ५००रु. ३०७२ नोटा एकुण रक्कम १५, ३६, ०००/- रु.२००रु. ७ नोटा एकुण रक्कम १४००/- रु. व १००रु. १०६ नोटा एकुण रक्कम १०,६००/- रु. असे मिळुन २७, ६२,०००/- ( सत्ताविस लाख बासष्ट हजार रुपये) त्यांच्या जवळुन मिळुन आले. एवढ्या मोठ्या रक्कमेबाबत विचारपुस केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. अधिक विचारपुस केली असता अशी माहिती मिळुन आली की, ही रक्कम भारत सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे असुन त्यातील २ हजार रुपयाच्या नोटा बदलविण्यासाठी दिले गेले आहेत. मिळुन आलेल्या दोन्ही इसमांवर यूएपीए अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.