आपला जिल्हा

दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

       गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने आज दि. 02/09/2022 रोजी गडचिरोली जिल्ह्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन नाशिक व मेहमुदा शिक्षण तथा महिला ग्रामिण विकास बहुउद्देशिय संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पाडण्यात आला.

या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील 200 बेरोजगार युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते, यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन नाशिक यांचे मार्फत 60 नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची व मेहमुदा शिक्षण व महिला ग्रामिण विकास बहुउद्देशिय संस्था नागपुर यांचे मार्फत 60 नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. असे एकुण 120 नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व युवतींना नियुक्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले, तसेच गडचिरोली पोलीस दल व प्रकल्प कार्यालय, भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील 28 आदिवासी युवतींना दिनांक 22/08/2022 ते 01/09/2022 रोजीपर्यंत 11 दिवसाचे आत्मसुरक्षा संबधीत कराटे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना ट्रकसुट व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.

यावेळी नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे  अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  समीर शेख सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  सोमय मुंडे  यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

आज पर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 484, नर्सिंग असिस्टंट 1143, हॉस्पीटॅलिटी 305, ऑटोमोबाईल 254, इलेक्ट्रीशिअन 142, प्लंम्बींग 27, वेल्डींग 33, जनरल डयुटी असिस्टंट 103, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई  52 असेएकुण 2,554 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 105 मत्स्यपालन 60 कुक्कुटपालन 457, बदक पालन 151, शेळीपालन 80, शिवणकला 137, मधुमक्षिका पालन 32, फोटोग्राफी 35, भाजीपाला लागवड 540, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 780, टु व्हिलर दुरुस्ती 34, फास्ट फुड 35, पापड लोणचे 30, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 370, एमएससीआयटी 200 असे एकुण 3012 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

        सदर महारोजगार मेळाव्याचे कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  सोमय मुंडे,संदीप कराडे,संचालक, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली, ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषतज्ञ कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली, मा. श्री. तुषार मेश्राम, प्रोजेक्ट हेड, मेहमुदा शिक्षण तथा महिला ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, नागपूर,आशिष इंगळे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, नाशिक, श्रीमती भारती प्रजापती, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, नाशिक हे उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker