क्रीडा व मनोरंजन

“तुझ्यात मी” मराठी चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल्ल

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

आज चंद्रपूरच्या निर्मात्याने निर्मित आणि चंद्रपूरच्या कलाकारांनी अभिनित केलेला मराठी चित्रपट पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल चा बोर्ड चंद्रपूर च्या इतिहासात प्रथमच खुप वर्षांनी अनुभवला आहे. त्याचा पहिला शो आज दुपारी १२ वाजता चंद्रपूरच्या प्रसिद्ध राजकला थिएटरमध्ये झाला जो विक्रमी पद्धतीने हाऊसफुल्ल झाल्याने अनेक मराठी चित्रपट रसिकांची तिकीट न मिळाल्याने निराशा झाली आहे.

सोमय्या फिल्म्स निर्मित, तुझ्यात मी हा त्यांचा पहिला मराठी फीचर फिल्म चंद्रपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

चंद्रपूरच्या निर्मात्या निर्मित आणि चंद्रपूरच्या कलाकारांनी अभिनित केलेला मराठी चित्रपट पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल हा इतिहासापेक्षा कमी नाही. सोमय्या फिल्म्सचे फक्त 10 ते 15% कलाकार आणि कर्मचारी सिनेमा हॉलमध्ये होते, बाकीची तिकिटे काउंटरवर विकली गेली, जे स्वत: निर्माते आणि कलाकारांसाठी एक सुखद आश्चर्य होते. इतकंच नाही तर आयटम साँगवर लोकं वारंवार शिट्ट्या वाजवतात, टाळ्या वाजवतात आणि स्वतःच्याच सीटवर नाचतात अशी दृश्यंही चित्रपटादरम्यान पाहायला मिळाली.

पहिल्याच दिवशी अशी गर्दी होती तिकीट घर मध्ये

चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिला ते ऐकून निर्माते आणि कलाकार भारावून गेले. चित्रपटानंतर, बहुतेक प्रेक्षकांनी याला एक उत्तम कौटुंबिक मनोरंजन म्हटले, त्याचप्रमाणे तरुण मुला-मुलींनी गाण्यांचे आणि कथेचे कौतुक केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्रपटानंतरच्या प्रतिक्रियांमध्ये, तरुण,मध्यमवयीन आणि ज्येष्ठांनी सर्वांनीच हा एक अप्रतिम चित्रपट असल्याचे वर्णन केले आहे. काहींनी चित्रपटाचा क्लायमॅक्स आणि चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक संदेश दिल्याबद्दल कौतुक केले. एकूणच या चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रियांवरून हा चित्रपट सुपरहिट होण्याच्या मार्गावर निघाला आहे, असे म्हणता येईल.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.