क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) सायकल रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी येथे ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन’ अंतर्गत

रत्नागिरी, प्रतिनिधी :

देशातील संपूर्ण समुद्रकिनारा सुरक्षित राहावा आणि सागरी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने Central Industrial Security Force (सीआयएसएफ) तर्फे ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किनारपट्टीवरून काढण्यात येत असलेल्या या सायकल फेरीद्वारे सुरक्षा, सतर्कता आणि देशभक्तीचा संदेश दिला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी येथे दाखल झालेल्या सीआयएसएफच्या १३० सायकलस्वारांचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी जवानांचे स्वागत करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर महाराष्ट्राचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सायकलस्वारांच्या चमूला हिरवा झेंडा दाखवून पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छांसह रवाना करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सीआयएसएफच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या देशसेवेबद्दल अभिमान व्यक्त केला.

या सायक्लोथॉन उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १४०० किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून, सीआयएसएफच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व चमूचे विशेष अभिनंदन केले. समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker