क्रीडा व मनोरंजन

चंद्रपूरात “तुझ्यात मी” आजपासून …

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

चंद्रपूरचे कलावंत यांनी आपली आज जगात वेगळीच छाप टाकली असून चंद्रपूर येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व पांडुरंग आंबेटकर आणि पियुष आंबेतकर निर्मित “तुझ्यात मी” हा मराठी चित्रपट आजपासून  चंद्रपूर सह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

चित्रपट रसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चंद्रपूरच्या प्रसिद्ध राजकला सिनेमात आज पासून रोज दुपारी १२ आणि ३ वाजता हा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना आतापासून यूट्यूबवर खूप पसंती दिली जात आहे.

ट्रेलर बघा…

या चित्रपटात शक्तीवीर उर्फ ​​अमर धीरल, प्राजक्ता शिंदे, भारत गणेशपुरे, नंदिनी बीके, हीना पांचाळ, प्रशांत कक्कड, संजय राम, प्रजेश घाडसे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात मराठी संस्कृतीचे मनोरंजन आणि सामाजिक संदेशाचे सुंदर मिश्रण केले आहे.

चंद्रपूर आणि विदर्भातील सर्व चित्रपट रसिक तुझ्यात मी‘ हा चित्रपट पाहावा, असे आवाहन या चित्रपटाचे निर्माते पी.एस.अटोरकर यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker