क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
नागेपल्ली येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्स संघाचा दणदणीत विजय

गडचिरोली,प्रतिनिधी :-
नागेपल्ली येथे आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्स स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. विविध प्रदेशांतील बलाढ्य संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यांनंतर लॉयड्स मेटल्स संघाने चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
या स्पर्धेत लॉयड्स मेटल्स, जबलपूर, खम्मम (तेलंगणा), गडिकुटम (तेलंगणा), चंद्रपूर आणि अमादा पल्ली येथील एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे स्पर्धा अत्यंत अटीतटीची व दर्जेदार ठरली.
थरारक अंतिम सामन्यात लॉयड्स मेटल्स संघाने जबलपूर संघाचा २–१ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. जबलपूर संघ उपविजेता ठरला, तर चंद्रपूर संघाने तिसरे स्थान पटकावले.
या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेला माजी राज्यमंत्री व पालकमंत्री श्रीमंत राजे अंबरीशराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय राणी रुख्मिणीदेवी आत्राम यांनी भूषवले, तर माननीय अवधेशरावबाबा आत्राम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.




