आपला जिल्हाताज्या घडामोडी
१२ फेब्रुवारीला, सिटूचा एल्गार; हजारो कामगार रस्त्यावर उतरणार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
केंद्र व राज्य सरकारच्या कथित कामगार व शेतकरी विरोधी धोरणांविरोधात १२ फेब्रुवारी रोजी सीटू संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो कंत्राटी कामगार, शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशव्यापी सार्वत्रिक संपाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून तब्बल ३० कोटी कामगार व शेतकरी संघर्षात उतरणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कामगारांनी अन्यायाविरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी केले आहे.



