क्राईम

एक नक्षलवादी ठार,मोठ्या प्रमाणात साहित्यही जप्त

बिजापूर,प्रतिनिधी :-

छतीसगड राज्यात भैरमगड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात उडालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत एक नक्षली ठार करण्यात पोलीस दलास यश आले आहे. घटनास्थळ परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्यांसह इतर साहित्यहि जप्त करण्यात आले आहे.यात 3-4 माओवादी ठार व जखमी झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुरु असलेल्या नक्षल विरोधी मोहिमेअंतर्गत 21 जुलै रोजी DRG, बस्तर फायटर आणि CARIPU 222 कॉर्प्सचे संयुक्त पथक भैरमगढ एरिया कमिटीच्या 10-15 सशस्त्र नक्षल्यांच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीवरून रवाना करण्यात आले होते. दरम्यान 22 जुलै रोजी सकाळी 07:00 ते 07:30 वाजताच्या दरम्यान, केशामुंडीच्या जंगली पहाडमध्ये शोधमोहीम सुरु असताना, नक्षल्यांनी पोलीस दलावर अंदाधुंद गोळीबार केला यावेळी पोलीस दलाने स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिला असता नक्षली जंगल डोंगराच्या आडून घटनास्थळावरुन पळून गेले. सुमारे अर्धा तास ही चकमक चालली. चकमकीनंतर परिसरात शोध घेत असताना 01 अनोळखी पुरुष नक्षलीचा मृतदेह सापडला, त्याच्या शरीरातून 01 पिस्तूल, मॅगझीन, 02 राऊंड जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळाची आजूबाजूला झडती घेतली असता नक्षली कॅम्पमधून कार्डेक्स वायर, जिलेटिन स्टिक, फ्यूज वायर, पिट्ट, नक्षली गणवेश, साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. 

घटनास्थळ परिसरातील झाडाझुडपांत रक्ताच्या थारोळ्यात आणि ओढणीच्या खुणा आढळल्या आहेत. यामुळे 3-4 माओवादी जखमी झाल्याची दाट शक्यता वर्तविण्या यत आहे. या घटनेत ठार झालेल्या नक्षलीच्या माओवादी मूत्यू मुखी पडल्याची शक्यता आहे .या घटनेत था झालेल्या नाक्षालीच्या मृतदेहाची ओळख पटविणे सुरु आहे.

घटनास्थळाचा आजूबाजूला झडती घेतली असता नक्षली कॅम्पमधून कार्डेक्स वायर, जिलेटिन स्टिक, फ्यूज वायर, पिट्टू, नक्षली गणवेश, साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळ परिसरातील झाडाझुडपांत रक्ताच्या थारोळ्यात आणि ओढणीच्या खुणा आढळल्याने 3-4 माओवादी ठार व जखमी झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेत ठार झालेल्या नक्षलीच्या मृतदेहाची ओळख पटवणे आणि इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे अशी माहिती आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.