क्राईम

असरल्लीत गांजा जप्त, १५ लाख रुपये किंमत

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

गडचिरोली जिल्ह्यात १५ लाख रुपयाचा अवैधपणे  वाहनांतून तब्बल दीड क्विंटल गांजा आणतांना महिलेसह एका पुरुष आरोपीस पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.तर कार चालक हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आज  छत्तीसगडराज्यातून गांजा घेऊन आलेली कार सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम असरअल्ली येथे पोलिसांनी सापळा रचून पकडली. यावेळी चालकाने कार दूर उभी करुन धूम ठोकली तर एक पुरुष व एक महिला अशा दोन परप्रांतीयांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. शिव विलास नामदेव व ज्योती सत्येंद्र वर्मा (दोघे रा. उत्तरप्रदेश) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत, तर चालकाचा शोध सुरु आहे.

छत्तीसगड येथून कारमधून एमएच -४,एएम-५५०१ असरअल्ली येथे गांजा येत असल्याची गोपनीय  माहिती असरअल्ली पोलिसांना मिळाली. असरअल्ली – पातागुडम रस्त्यावरील वनविभागाच्या नाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांना पाहून चालकाने कार उभी करुन धूम ठोकली. पाठोपाठ शिव नामदेव व ज्योती वर्मा यांनीही कार सोडून पलायनाचा प्रयत्न केला, परंतु त्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख, उपअधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश गावडे, अंमलदार जगन्नाथ कारभारी, दिलीप उडके, शंकर सलगर, आदिनाथ फड यांनी ही कारवाई केली आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.