राजकीय

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत येणार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली येथे महाविकास आघाडी तर्फे नामदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधीपक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल गडचिरोलीत प्रथम आगमनानिमित्य जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

लोकनेते विकासपुरुष राज्याचे विधानसभा सभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विधानसभा विरोधीपक्ष नेते निवड झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. त्यानिमित्याने गडचिरोली महाविकास आघाडी च्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

या बाबत आज बैठक पार पडली. 13 ऑगस्ट दुपारी 2 वाजता ना.विजय वडेट्टीवार यांचे आगमन आरमोरी रोडवर होणार आहे. त्यानंतर मार्केट लाईन मधून त्यांची रॅली निघणार असून इंदिरा गांधी चौकातील सभागृहात सत्कार समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला तीन हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार,शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड रामभाऊ मेश्राम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार,जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, युवा नेते राकेश नागरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, माजी नगरसेवक नंदू कायरकर, माजी नगरसेवक शेखर आखाडे, ऍड.दुगाजी, उमाजी वासाडे, पंकज बारसिंगे, कल्पक मुप्पीडवार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.