सामाजीक

एक दिवसीय स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न

नागपूर,प्रतिनिधी :-

अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघ कृत हलबा समाज कल्याण उपक्रम व  जैन एमपॉवरमेंट ऑर्गनाइजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हलबा जमातीतील बेरोजगार युवक व युवती करिता स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर दिनांक 27 ऑगस्ट 2023 रविवार रोजी  राधेश्याम विणकर सार्वजनिक मंडळ, बाळाभाऊ पेठ, नागपूर येथे संपन्न झाले.

या शिबिरांत पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत  स्वयंरोजगार स्थापन करण्याकरिता युवक व युवतींना माहिती, संबंधित क्षेत्रातील प्रतिष्ठित व तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले.

यामधे रवींद्र मनोहरे जिल्हा अधीक्षक,कृषी अधिकारी यांनी विविध योजनांची माहिती सविस्तर रित्या मांडली. यामध्ये त्यांनी पंतप्रधान कृषी योजना पासून तर यु ट्युब चॅनेल ,सेंद्रिय खत, बांबू उद्योग व इतर उद्योगाची संपूर्ण माहिती दिली.त्याचबरोबर त्यांनी स्वयंरोजगार करण्याकरिता इच्छुक असलेल्या युवकांनी व युवतींनी संबंधित क्षेत्रातील वावरत असलेल्या व्यक्तिमत्त्वासोबत देखील संपर्क साधून रोजगारास संबंधित चर्चा करावी असे देखील आवाहन केले.त्यानंतर गजानन गिरोलकर, जिल्हा मानव संसाधन विकास,यांनी व्यवसायाकरिता योजना मंजूर करण्याबाबत माहिती विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केली.

जैन एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष,उद्योगपती व प्रमुख वक्ते अभिनंदन पळसापूरे यांनी स्वयंरोजगार उभारणी करिता परस्परसंवाद साधून प्रेरणात्मक मार्गदर्शन केले. तसेच जैन एमपावरमेंट ऑर्गनायझेशनच्या संचालिका व समाजसेविका शुभांगी ताई लांबाडे यांनी अगदी उत्कृष्ट रित्या एकमेका सहाय्य, करू अवघे धरू सुपंथ हा मूलमंत्र दिला, जेणे करून आपला स्वतःचा विकास तर करूच पण आपल्या सोबत आपल्या जमातीचा पण विकास करू.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे अध्यक्ष व मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आदींम चे नेते प्रकाश निमजे, प्रशांत सिलेकर, शरद सोनकुसरे प्रमुख उपस्थितीत व सर्व उपस्थित अतिथी गण यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

उपक्रमाचे संयोजक व महा मेट्रोचे निवृत्त कार्यकारी संचालकमा गिरधारी पौनिकर यांनी स्वयंरोजगार शिबिराचे प्रास्ताविक केले. त्यांनी हलबा समाज कल्याण उपक्रमाच्या कार्याचे विश्लेषण केले व हलबा समाजाकरिता करीत असलेल्या कार्याचे उद्देश समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन व संचालन प्रा.प्रकाश निमजे यांनी केले

मागील चार महिन्यापासून गिरिधारी पौनीकर सोबत प्राध्यापक प्रकाश निमजे यांनी तांडा पेट ,लालगंज,नाईक तलाव ,बांगलादेश ,टिमकी ,गोळीबार चौक, खरबीकर मोहल्ला, नवीन मंगळवारी ,गुप्ता नगर,भावे नगर, जुनी मंगळवारी इत्यादी परिसरात जिथे हलबा समाज उपलब्ध आहे. तेथे जाऊन घरोघरी संपर्क साधून ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे,जे शिक्षण पासून वंचित आहे किंवा शिक्षण झाल्यानंतर ज्यांचा उदरनिर्वाह होत नाही किंवा नोकरी मिळत नाही अशा बेरोजगार व शिक्षित मुलांना मुलींना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची नोंदणी करून घेतली गेली आहे.

हलबा समाजाच्या या स्वयंरोजगार शिबिर कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून उपस्थित असलेल्या बहुतांश युवकांनी व युवतीने स्वयंरोजगाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

स्वयंरोजगार शिबिराचेआभार प्रदर्शन श्री. विष्णु भनारकर यांनी केले. कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता दीपक उमरेडकर,आश्विन अंजिकर, प्रदीप पौनिकर, प्रो. हरेश निमजे, अरविंद गडीकर, विष्णु भनारकर,पंकज निमजे, मोरेश्वर पराते,चेतन निखारे, हर्षल यांनी अथक परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.