क्राईम

जिमलगट्टा येथे १० लाखाची दारू जप्त

दहा चाकी वाहनासह 25,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली,प्रतिनिधी :-

       आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस दलाने जोरदार कारवाई करीत आज  जिमलगट्टा पोलीसांनी  २५ लाख  रुपयाचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनिय बातमीदाराकडुन दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर,उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिरादार व पोलीस स्टाफ यांनी सापळा रचुन आज हि कारवाई केली आहे.

 आरोपी नामे कैलास मडावी रा. लखनगुड्डा यास पकडुन त्याचे ताब्यातुन 1) अशोक लेलँड कंपनीची दहा चाकी माल वाहतुक वाहन क्र. एम. एच. 40 सी. डी. 3530 किंमत अंदाजे 15,00,000/- रु. (अक्षरी पंधरा लाख रुपये) 2) रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारुचे 270 बॉक्स किंमत अंदाजे 10,00,000/- रु. (अक्षरी दहा लाख रुपये) चा असा एकुण 25,00,000/- रु. (अक्षरी पंचवीस लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपीवर उप पोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्राचा पुढील तपास वरीष्ठंाचे मार्गदर्शनाखाली सपोनि. संगमेश्वर बिराजदार हे करत आहेत.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

       सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार, मपोउपनि. पुजा गव्हाणे, पोउपनि. ज्ञानेश्वर कोल्हे, पोउपनि. आनंद गिरे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.