महाराष्ट्र

अखेर ठाकूर समाजातील युवकाला मिळाला न्याय

औरंगाबाद,प्रतिनिधी :-

ठाकूर समाजातील युवकाला मिळाला न्याय मुंबई उच्च न्यायालयाने देत नोकरीत तात्काळ रुजू करून घेण्याचे आदेश पारित केले. सोबतच नोकरीतून कमी केलेल्या कालावधीतील 50 % वेतन आणि वार्षिक वेतन वाढ देऊन सदरील कालावधी हा सेवा काळ ग्राह्य धरण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे ज्यांची नोकरी गेली आहे त्यांचे नोकरीचे स्वप्न लवकर पूर्ण होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

 चंद्रकांत गोकुळ खैरनार-ठाकूर हे Thane municipal Transport mumbai येथे नोकरीस आहेत. त्यांच्याकडील 1950 पूर्वीचे कागदपत्र तपासून नाशिक समितीने त्यांना ठाकूर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र दिले होते. सन 2022 मध्ये त्यांच्या पुतणीचे प्रकरण जुन्या भाट नोंदीच्या आधारे अवैध ठरवण्यात आले होते. त्यामुळे चंद्रकांत खैरनार-ठाकुर यांना दिलेली वैधता देखील समितीकडून रद्द करण्यात आली होती.समितीच्या निर्णयामुळे Thane Municipal Transport mumbai ने त्यांना तात्काळ नोकरीतून कमी केले.

 चंद्रकांत खैरनार यांनी जेष्ठ विधिज्ञ अँड.सुशांत येरमवार साहेब यांच्या मार्फत तात्काळ याचिका (WP No.8851/2022) दाखल केली.अँड.सुशांत येरमवार यांनी मा.मुंबई उच्च न्यायलय,खंडपीठ,औरंगाबाद येथे दाखल केली होती.

न्यायालयासमोर या  प्रकरणाची सुयोग्य मांडणी आणि अभ्यासपूर्ण युक्तीवाद करुन न्या.रवींद्र व्ही.घुगे आणि मा.न्या.वाय.जि.खोब्रागडे यांच्या खंडपीठाकडून दि.3.10.2023 रोजी न्याय मिळवून दिला.

विशेष बाब: आदिवासी नोकर वर्ग ठाकूर आणि ठाकर समाज उत्कर्ष संस्था या संघटनेने चंद्रकांत खैरनार/ठाकुर यांना वैधता मिळू नये यासाठी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न केले.परंतू त्यांचा हा प्रयत्न ठरला.

 या प्रकरणात मा.न्यायालयाने रद्द केलेली वैधता पुन्हा मिळवून दिली. तसेच नोकरीत तात्काळ रुजू करून घेण्याचे आदेश पारित केले.सोबतच नोकरीतून कमी केलेल्या कालावधीतील 50 % वेतन आणि वार्षिक वेतन वाढ देऊन सदरील कालावधी हा सेवा काळ ग्राह्य धरण्याचे आदेश दिले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.