ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विभागीय स्पर्धा परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे, प्रतिनिधी :-

राज्यातील जिल्हा परिषदांतील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा–२०२५ चे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही परीक्षा ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार असून, दोन्ही दिवशी तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र www.mscepune.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करताना अडचण आल्यास १८०००२२२३६६ / १८००१०३४५६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा https://cgrs.ibps.in या लिंकवर तक्रार नोंदवावी.

लॉगिन आयडी म्हणून आवेदनपत्रावरील नोंदणी क्रमांक वापरायचा असून, पासवर्ड म्हणून उमेदवाराची जन्मतारीख ग्राह्य धरली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker