ताज्या घडामोडी

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल माओवाद्यास अटक

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल माओवाद्यास अटक केली. या जहाल माओवादी वर शानानाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करीत असतांना त्यांच्या चळवळ ला हा जबर हादरा बसला आहे.

 

जहाल माओवादी नामे महेंन्द्र किष्टय्या वेलादी, वय 32 वर्षे, रा. चेरपल्ली, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छत्तीसगड) हा उपपोस्टे दामरंचा जवळ असलेल्या इंद्रावती नदीजवळ पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ 9 बटालियन जी कंपणीचे जवान व उपपोस्टे दामरंचा पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली.

हा माओवादी दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोस्ट पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने अहेरी दलमच्या माओवाद्यांना माहिती पुरवीत होता.  त्याचा 2023 च्या सुरवातीला झालेल्या कापेवंचा ते नैनेर जंगल परिसरात वन अधिका­यांवर दरोडा, हल्ला आणि जाळपोळ करण्याच्या घटनेमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले आहे.  त्यानुसार त्यास उपपोस्टे राजाराम (खां) तह. अहेरी, जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 397, 332, 353, 341, 324, 323, 120 (ब), 427, 435, 143, 147, 148, 149, 506, 186 भादवी, 3/25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 07 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.

अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

महेंन्द्र किष्टय्या वेलादी

दलममधील कार्यकाळ

सन 2009 मध्ये माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये कार्यरत असतांना माओवादी गावाजवळ आल्यावर सेंट्री ड्युटी करिता जाणे तसेच दामरंचा बाजारातून माओवाद्यांना (किराणा, भाजीपाला इ.) सामान पोहचविण्याचे काम करीत होता.

तो सन 2010 पासून नॅशनल पार्क, बीजापूरच्या सॅण्ड्रा भागात सीपीआय (एम.) चा चेरपल्ली आरपीसीचा (रक्षा पार्टी कमीटी) सदस्य होता.

त्यानंतर तो नॅशनल पार्क एरिया, बीजापूर येथील सॅण्ड्रा दलममध्ये सदस्य म्हणून काम करत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे

चकमक – 02

माहे डिसेंबर 2017 मध्ये मौजा सॅण्ड्रा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.

माहे डिसेंबर 2022 मध्ये गडचिरोली आणि बीजापूर पोलीसांच्या संयुक्त पथकासोबत मौजा टेकामेट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.

जाळपोळ – 01

सन 2023 मध्ये मौजा कापेवंचा ते नैनेर जाणा­या रोड जंगल परिसरात वन विभागाच्या कर्मचा­यांना मारहाण व त्यांचे वाहन जाळपोळीच्या गुन्ह्रात सहभाग.

खुन – 01

माहे मे 2023 रोजी सॅण्ड्रा गावातील एका निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker