आपला जिल्हानिवडणूक

गडचिरोलीतील तीन जागांची निवडणूक रद्द होण्याची शक्यता!

गडचिरोली, प्रतिनिधी :–

नगर परिषद गडचिरोली सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदानाला अवघे ४८ तास उरले असतानाच आज तीन प्रभागांतील तीन जागांची निवडणूक रद्द होऊ शकते, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याचे समजते.

नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ५७ नगरपालिकांच्या निवडणुकांना स्थगिती न देता पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली असून या ५७ नगरपालिकांमध्ये गडचिरोली नगर परिषदेचाही समावेश आहे.

आज सायंकाळपर्यंत निर्णयाची शक्यता
गडचिरोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १अ, ४ब आणि ११ब या तीन जागांबाबत निवडणूक आयोगाकडून आज सायंकाळपर्यंत मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. ते मिळाल्यानंतर या जागांची निवडणूक रद्द होणार की पुढे ढकलली जाणार याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.

फक्त वरील तीन जागांकरिता निर्णय होणार असून इतर सर्व जागांसाठी मतदान 02 डिसेंबर 2025 रोजी, आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसारच पार पडणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी दिली आहे.

प्रभागांचे आरक्षण

१ अ – अनुसूचित जाती महिला

४ ब – सर्वसाधारण

११ ब – सर्वसाधारण

या तीन जागांवर निवडणूक रद्द किंवा स्थगित होण्याची शक्यता व्यक्त झाल्यामुळे संबंधित प्रभागातील उमेदवारांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker