आपला जिल्हाक्राईम

अवैध दारू व चारचाकीसह ₹9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका चारचाकी वाहनातून देशी-विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकूण ₹9,86,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

काल 31 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, जिनेश मेश्राम व आकाश भरडकर, दोघे रा. गोकूलनगर, गडचिरोली हे महिंद्रा चारचाकी (क्र. MH-46 AL-0027) मधून चातगाव मार्गे देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी मौजा चातगाव कारवाफा टी-पॉइंटवर सापळा रचला. वाहन चालकाने पोलिसांचा इशारा दुर्लक्ष करून वाहन थांबवले नाही व साखेरा–जांभळी मार्गावर ते उभे करून आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

यानंतर वाहनाची तपासणी केली असता, खालील प्रमाणे मोठ्या प्रमाणावर दारू आढळली:

रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या 4,500 बाटल्या — किंमत ₹3,60,000

हायवर्ड 5000 बिअर – 120 बाटल्या — किंमत ₹42,000

बडवायझर मॅग्नम बिअर – 96 बाटल्या — किंमत ₹33,600

रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की – 96 निपा — किंमत ₹38,400

महिंद्रा चारचाकी वाहन – किंमत ₹5,00,000

दोन मोबाईल फोन – किंमत ₹12,000

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹9,86,000 इतकी आहे.

या प्रकरणी पोस्टे चातगाव येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ), 83, 98(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास मपोउपनि. आश्विनी पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि भगतसिंग दुलत, पोहवा सुधाकर दंडीकवार, पोना धनंजय चौधरी, आणि चापोअ दिपक लोणारे यांनी केली.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker