क्राईम

गडचिरोली पोलीसांनी केली १४ लाख रुपयाची अवैधदारू जप्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-

     गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. या अवैध दारु विक्री करणा­यांवर कारवाई करीत १४ लाखरुपयांची दारू जप्त करून अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणणाले आहे.

 काल दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी मनोज मजुमदार आपल्या चारचाकी बोलेरो पिकअपने चंद्रपुर-मुलचेरा-एटापल्ली मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्था.गु.शा. चे सपोनि. राहुल आव्हाड व त्यांचे पथक मुलचेरा तालुक्यातील कोपरअली गावजवळ सापळा रचून बसले असता, रात्री 12.00 वा दरम्यान एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन अडविण्याचे कारण सांगून वाहनाची तपासणी केली.

सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध विदेशी दारू व बिअरचे 143 पेटी किंमत अंदाजे 14,00,400/- रु. मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहन क्र. एम. एच. 33 टी 5095 किंमत अंदाजे 7,00,000/- रु. असा एकुण 21,00,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे मुलचेरा येथे कलम 65 (अ) व 98 (2) महा. दा. का. अन्वये इसम नामे मनोज मजुमदार वय 45 वर्ष रा. ता. एटापल्ली. जि. गडचिरोली याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर इसमावर यापूर्वी देखील पोस्टे गडचिरोली येथे अवैध दारुच्या बेकायदेशीर वाहतूकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker