आपला जिल्हानिवडणूक
काँग्रेसचे ऍड.विश्वजित मारोतराव कोवासे अपक्ष लढणार
जिल्ह्यात काँग्रेस मध्ये बंडखोरी...

उदय धकाते
गडचिरोली :-
गडचिरोली विधानसभा निर्वांचन क्षेत्रातून काँग्रेस चे युवा नेते ऍड. विश्वजित मारोतराव कोवासे हे अपक्ष लढनार आहेत. जिल्ह्यात काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी फूट पडली आहे. या पक्षात निष्ठावान नेत्यांना डालवून नवख्या व्यक्तीला उमेदवारी पक्षाने दिल्याने मागील ४० वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्यांना दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष विरोधात काम करणाऱ्या एका नेता करीत असल्याने पक्षात असंतोष निर्माण झालेला आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मागील ४५ वर्षा पासून माजी मंत्री तथा माजी खासदार कोवासे यांनी पक्षाचे ध्येय ग्रामीण भागात रुजवून पक्षाला मोठं केल आहे. आता पक्षाला कोवासे यांचा विसर पडला आहे.
माजी मंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र विश्वजीत कोवासे हे मागील ६-७ वर्षापासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी आणण्यासाठी दिवस रात्र एक केली. काँग्रेस पक्ष त्यांना उमेदवार करतील असं वाटतं असतांना त्यांना उमेदवारी दिली नाही. या मुळे काँग्रेस पक्षात असंतोष निर्माण झाला असून हजारो कार्यकर्ते च्या आवाहन नुसार उद्या शेवटच्या दिवशी ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे हे अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत.विशेष हे कि कोवासे यांचा खासदार किरसान यांना निवडून आणण्याचा मोठा वाटा आहे. पण किरसान यांना विसर पडला. अशी प्रतिक्रिया काँग्रेस चे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात काँग्रेस मध्ये बंडखोरी…
काँग्रेस पक्षात आरमोरी विधानसभा क्षेत्रातून माजी आमदार आनंदराव गेडाम, अहेरी विधानसभा क्षेत्रातून माजी आमदार पेंटा रामा तलांडी हे सुद्धा उमेदवारी दाखल करणार आहेत. अशी माहिती महाभारत न्यूज ला सूत्रांनी दिली आहे.



