आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात आज 22 कोरोना बाधित

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

आज गडचिरोली जिल्हयात 587 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 22 असून कोरोनामुक्ताची संख्या 10 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37794 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36927 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 92 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.24 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.

        आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 09, कोरची तालुक्यातील 01, व कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 02 व कोरची तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker