गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील दिनांक 06फेब्रुवारी 2025 रोजी शेतशिवारामध्ये वनपरीक्षेत्र अधिकारी (चातगांव) व आरआरटी टिम यांना वाघ जखमी अवस्थेत आढळला.सदर घटनेची तात्क्ळ वरीष्ठ कार्यालयास सुचना देण्यांत आली. व वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार रात्रभर वाघावार निगरानी ठेवण्यांत आली. एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेनुसार व वरीष्ठांच्या आदेशानुसार वाघास उपचाराकरीता दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जेरबंद करण्यांत आले व उपचाराकरीता चंद्रपुर येथे पाठविण्यांत आले.
वाघाच्या जखमांची कारणमिमांसा पशुवैद्यकीय अधिकारी टीटीसी चंद्रपुर येथे तपासणी झाल्यानंतर अहवाल समोर येईल. सदर घटनेचा तपास सुनिल सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी चातगांव व त्यांचे कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक गडचिरोली शैलेश मिना व अंबरलाल मडावी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) चातगांव व आरआरटी टिम, नवेगांव नागझिरा स्थित साकोली यांचे उपस्थितीत कार्यवाही पार पडली, असे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांनी कळविले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia