निवडणूक
राष्ट्रवादी – नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अश्विनी ताई नैताम

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या भव्य रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. अश्विनी ताई नैताम यांनी, पक्षाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांसह, मोठ्या जल्लोषात व शिस्तबद्ध पद्धतीने आपले नामांकन अर्ज दाखल केले.



