निवडणूक

अखेर राष्ट्रवादी शरद पवार गट,मनसे व शिवसेना (उबाठा)सोबत आघाडीरिंगणात

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असून, युती–आघाडी धर्म बाजूला ठेवून ‘सोयीची साथ’ मिळवण्याची चढाओढ वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्रित आघाडी जाहीर करत निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावरून बिपाशा नागनाथ (राजू) भुसारे या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मंगळवार (१८ नोव्हेंबर) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.या वेळी आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी सांगितले की, “या निवडणुकीत आमच्या आघाडीचे १८ उमेदवार रिंगणात आहेत. काही इच्छूकांचे दस्तऐवज वेळेत पूर्ण न झाल्याने २१ जागांवर उमेदवार उभे करता आले नाही. गडचिरोली शहरात राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षांचे मजबूत नेटवर्क आहे. हे सर्व कार्यकर्ते एकजुटीने निवडणूक लढवणार आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की आघाडीकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे १२ आणि शिवसेना (उबाठा)चे ६ उमेदवार अधिकृतरीत्या रिंगणात उतरले आहेत.

सर्वात तरुण नगराध्यक्ष पदाची उमेदवार –

२२ वर्षीय बिपाशा भुसारे या नगराध्यक्ष पदाच्या सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरत असून, त्यांनी पुण्यातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्या मुक्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या सेवाकार्यातही सक्रिय असल्याची माहिती गण्यारपवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला वकील संजय ठाकरे (राष्ट्रवादी),

वासुदेव शेडमाके (शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष),राजेंद्र साळवे (मनसे जिल्हाध्यक्ष), शेमदेव चाफले (राकॉ ओबसी आघाडी), नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभागनिहाय उमेदवार यादी (आघाडी – राष्ट्रवादी/उबाठा/मनसे)

नगरपरिषद अध्यक्ष

बिपाशा नागनाथ (राजू) भुसारे

प्रभाग क्र. १

(ब) प्रशांत शामराव आखाडे

प्रभाग क्र. २

(अ) पवन राघो गेडाम

(ब) सुनीता प्रभाकर नैताम

प्रभाग क्र. ४

(अ) भावना अतुल हजारे

(ब) हिमांशू विश्वासराव देशमुख

प्रभाग क्र. ५

(अ) करिष्मा गजानन भैसारे

(ब) राकेश विनायक रत्नावार

प्रभाग क्र. ६

(अ) सुलभा सुभाष कावळे

(ब) मंगला राजेश भट्टलवार

प्रभाग क्र. ७

(अ) अपर्णा अनिल खेवले

प्रभाग क्र. ८

(ब) सचिन दिवाकर येणप्रेडीवार

प्रभाग क्र. १२

(अ) आशा मुकेश मेश्राम

(ब) चंद्रशेखर नरेंद्र नैताम

प्रभाग क्र. १३

(अ) तुळशीराम रुषी सहारे

(ब) पूजा पंकज जावादे

(क) मीनाताई सुरेश बोभाटे

आघाडीची ही यादी जाहीर झाल्याने निवडणुकीत तिढा निर्माण झाला असून, स्थानिक राजकारणात नवे गणित तयार झाले आहे. प्रचार रणनिती, पक्षांच्या हालचाली आणि प्रतिस्पर्ध्यांची रणनीती आता शहरात चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker