झाडीपट्टीमध्ये गायन, वादन, नृत्य, लावणी,व अभिनय अशा विविध अंगी कला बघावयास मिळतात त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कलावंतांची खाण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.या कलाकारांच्या अभिनयापुढे मुंबई- पुणे कडील कलावंत सुद्धा कमी पडतात.जिल्हयातील कलावंतांनी आपली कला अविरत जोपासावी असे प्रतिपादन प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली यांनी केले.
राजवी प्रोडक्शन मित्रपरिवार गडचिरोली द्वारा आयोजित स्वर्गीय गजू भाऊ उर्फ विवेक काशीरामजी चडगुलवार यांचे स्मरणार्थ विदर्भ स्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेच्या उद्घाटन पर कार्यक्रमत ते बोलत होते. सर्वप्रथम स्वर्गीय गजूभाऊ उर्फ विवेक चटगुलवार यांचे प्रतिमेचे व नटेश्वर मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलाने उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महेंद्र गणवीर तहसीलदार गडचिरोली हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नामदेव मंडलवार, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, काशीराम सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक,वामनराव सावसागडे,अध्यक्ष किसान काँग्रेस,प्राध्यापक समशेर खा पठाण,मारोतराव ईचोडकर,माजी सभापती पंचायत समिती गडचिरोली,चुडाराम बल्हारपुरे, नाटककार जेष्ठ नाट्य कलावंत सुनील शेडगुलवार,भास्कर मेश्राम सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, दादाजी चौधरी ज्येष्ठ नाट्य कलावंत, प्रवीण मुक्तावरम उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त गुरुकुंज मोझरी मोझरी, सौ निर्मला चडगुलवार, सौ.मनीषा मडावी, झाडीपट्टी नाटक कलावंत मुन्नाभाई बिके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.