गडचिरोली विधानसभा मतदार क्षेत्रातून भाजपातील बंड अखेर शमविण्यात श्रेष्टींना यश मिळाले असून भाजपचे नाराज आमदार डॉ. देवराव होळी हे उद्या नामांकन अर्ज मागे घेणार आहेत.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून दोनदा आमदारचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे आमदार डॉ. होळी हे तिसऱ्यांदा आमदार पदाच्या शर्यतीत हिते. परंतु त्यांना भाजपाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यानी भाजपात बंडाचा पवित्रा घेऊन भाजपात फूट असल्याचे प्रथमच पुढे आणून भाजपच्या शिस्त प्रिय प्रतिमेला जोरदार धक्का देत त्यांनी मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत पक्षा तर्फे व नंतर अपक्ष अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली.यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले.
आज डॉ. होळी यांच्यावर पक्षाचं प्रचंड दबाव आल्याने त्यांनी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकट वर्णीय यांनी आज महाभारत न्यूज ला सांगितले. डॉ. होळी हे भाजपचा प्रचार करणार आहेत.