राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

चंद्रपूर, प्रतिनिधी :-
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे विविध विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हे पुरस्कार गोयेगाव (मंडळ केरामेरी), जिल्हा आसिफाबाद येथे आयोजित राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
घोषित पुरस्कार पुढीलप्रमाणे –
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारकृती पुरस्कार – श्री. गोपाळ कडू (प्रचारप्रमुख, गुरुकुंज आश्रम)
किसन वडस्कर स्मृती समन्वयक पुरस्कार – श्री. संजय वैद्य (वरोरा)
लिलाबाई वडस्कर स्मृती कीर्तनसेवा पुरस्कार – श्री. उदार महाराज (बेला)
आनंदीबाई मांडवकर स्मृती श्रीगुरुदेव प्रचारक पुरस्कार – श्री. पांडुरंग शेंडे (देवाडा)
डॉ. मोतीजी महाराज स्मृती श्रीगुरुदेव वैद्यकीय सेवा पुरस्कार – श्री. सुभान शेख
जगन्नाथजी गावंडे स्मृती श्रीगुरुदेव सामाजिक कार्य पुरस्कार – श्री. केवलराम गेडाम
माधव जेनेकर स्मृती श्रीगुरुदेव कृषी सेवा पुरस्कार – श्री. शिवाजी भेदोडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार – श्री. दिलीप वावरे
साने गुरुजी शिक्षक पुरस्कार – डॉ. धर्मा गावंडे
श्रीगुरुदेव गोसेवा पुरस्कार – श्री. बापूजी आदे (गोयेगाव)
लटारी उगे स्मृती व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार – श्री. प्रकाश सोनटक्के (सांगडी)
तुळसाबाई चौधरी स्मृती उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार – श्री. अनुराग मुळे
सदारामजी पारधी स्मृती श्रीगुरुदेव भजनसेवा पुरस्कार – श्री. प्रल्हाद उईके (रामपूर)
यशवंत बोबडे स्मृती श्रीगुरुदेव श्रमश्री पुरस्कार – श्री. सुरेश चौधरी (नांदा)
पुरुषोत्तम हिरादेवे स्मृती श्रीगुरुदेव पत्रकारिता पुरस्कार – श्री. उदय धकाते (गडचिरोली)
प्रमोद देशमुख स्मृती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षक पुरस्कार – श्री. मनोहर बोबडे (टेंबुरवाही)
किसन नवघरे स्मृती श्रीगुरुदेव प्रचार पुरस्कार – बावणे महाराज (वानेरी)
रुखमाबाई बोबडे स्मृती महिला सेविका पुरस्कार – सौ. शुभांगी अनमुलवार
शोभाताई हिरादेवे स्मृती मातामंजुळा प्रचारिका पुरस्कार – सौ. मालुताई कोंडेकर (ऊर्जानगर)
आनंदाबाई मत्ते स्मृती सेवाभावी दाम्पत्य पुरस्कार – सौ. आशाताई व संजय लोहे (कढोली)
कर्णुजी देवाळकर स्मृती योग सेवा पुरस्कार – श्री. विनायक साळवे (बामणी)
पोच्चक्का मंचलवार उत्कृष्ट श्रीगुरुदेव सेवा मंडळ पुरस्कार – श्रीगुरुदेव सेवा मंडळ, पेंढरी (कोके)
चिमणाबाबू झाडे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार – श्री. उद्धवराव ऊरकुडे (पेल्लोरा)
श्रमिक एल्गार प्रतिष्ठानतर्फे श्रीगुरुदेव विधीसेवा व महिला जनजागृती पुरस्कार – ॲड. सारिका जेनेकर
दरम्यान, दि. ७ फेब्रुवारी रोजी गोयेगाव येथे जनप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये चेतन ठाकरे यांचे भारूड, अनुराग मुळे यांचा एकपात्री प्रयोग, पालिकचंद बिसने यांचे बासरी वादन, पुरुषोत्तम लांजेवार यांच्या नाट्यछटा तसेच बावणे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे परिषदेचे ॲड. कल्याण कुमार, ॲड. राजेंद्र जेनेकर, लटारू मत्ते, बळीराम बोबडे, नामदेव गेडकर, विलास चौधरी, विशाल गावंडे, पंढरीनाथ चंदनखेडे, प्रेमलाल पारधी, केशव दशमुखे, विलास उगे, भाऊराव बो
बडे आदींनी अभिनंदन केले आहे.



