आपला जिल्हा

१८ ऑगस्टला कोठरी येथे होणाऱ्या बौद्ध समाजा मेळावा होणार

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

बौद्ध समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १८ ऑगस्ट रोज रविवारला सकाळी ११ वाजता “बौद्ध समाज मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे .या बौद्ध समाज मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बौद्ध समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने केले आहे.

बौद्ध समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वतीने बौद्ध समाज मेळाव्याचे आयोजन भन्ते भगीरथ यांची भेट व कार्यक्रम संदर्भात चर्चा करण्यात आली.बौद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्ता विकास कामाचे 1.20 कोटी रु. भूमिपूजन होणार आहे. 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोठरी  परिसरात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. यानिमित्ताने या कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला अधिकाधिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  या माध्यमातून केले आहे. 

यावेळी प्रामुख्याने उपसरपंच छत्रपती दुर्गे, दिलीप चलाख, जैराम चलाख, सुरेश शहा, यश गण्यारपवार,अक्षय नरोटे, अशोक पुडो, संजय पुडो, उपस्थित होते

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker