आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतर

आता कामकाज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून

गडचिरोली, प्रतिनिधी :-

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालय पूर्वी एस.टी. डेपो समोर, धानोरा रोड, गडचिरोली येथे कार्यरत होते. मात्र सदर कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आल्यामुळे कार्यालयाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे.

सदर कार्यालय आता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली (एलआयसी कार्यालयाजवळ) येथून कार्यरत असून, सर्व प्रशासकीय व कार्यालयीन कामकाज तेथूनच पार पाडले जात आहे.

तरी नागरिकांनी तसेच संबंधित शासकीय कार्यालये, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील सर्व प्रशासकीय, न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली (एलआयसी कार्यालयाजवळ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी एम. अरूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker