आपला जिल्हाताज्या घडामोडी

निसर्गरम्य सोमनूरकडे जाणारा रस्ता जीवघेणा; नागरिकांची दुरुस्तीची मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेले सोमनूर हे पर्यटन व निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाण असून येथे तीन राज्ये आणि तीन नद्यांचा संगम आहे. मात्र या रम्य स्थळाकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक बनला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सोमनूरकडे जाताना असरअल्लीपासून पुढील रस्ता अतिशय बिकट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्यात आले असले तरी काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येकडे देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल तसेच स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्रम यांचे लक्ष वेधले आहे. सिरोंचा तालुका हा अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून किमान रस्त्यांची स्थिती सुधारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सोमनूर हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक व स्थानिक नागरिकांची ये-जा असते. मात्र खराब रस्त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सोमनूरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करून दर्जेदार मार्ग निर्माण करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker